Latest News

6/recent/ticker-posts

पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीस शोधण्यास लातूर पोलीसला यश

पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीस शोधण्यास लातूर पोलीसला यश

लातूर: जुलै २०२२ मध्ये एक मुलगी पळून गेली होती. या प्रकरणात तपास चालूच होता. मात्र, अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शामल देशमुख यांच्या पथकाने नगर जिल्ह्यातून पळून गेलेल्या त्या अल्पवयीन मुलीस श्रीरामपूर व शिर्डी येथे ताब्यात घेवून तिला पालकाच्या हवाली करण्यात आले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे हे करीत होते. संबंधित तपास अधिकारी यांनी विविध ठिकाणी जाऊन या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. मात्र, ही अल्पवयीन मुलगी कोठेही मिळून येत नव्हती. नमूद गुन्ह्याची माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करून सायबर सेल च्या मदतीने माहिती काढून सदर गुन्ह्यातील मुलगी ही अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख यांच्या नेतृत्वात सदर पथक श्रीरामपूर व शिर्डी येथे पोहोचून मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली. त्या मुलीस पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सायबर सेलच्या मदतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष चे पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, निहाल मणियार, महिला पोलिस अंमलदार लता गिरी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments