Latest News

6/recent/ticker-posts

रसिका महाविद्यालयात महिला कायदेविषयक कार्यशाळा

रसिका महाविद्यालयात महिला कायदेविषयक कार्यशाळा

देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) कै. रसिका महाविद्यालय येथे 9 डिसेंबर 2022 रोजी महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन युवती कल्याण मंडळाच्या वतीने करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवाजी सोनटक्के होते तर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून देवणी येथील विधीतज्ञ शिवानंद मळभागे उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी 2013 चा प्रतिबंधक कायदा याविषयी सविस्तर मार्गदर्शन ॲड. मळभगे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रो.डॉ.अनिता सोनवणे या उपस्थित होत्या. तसेच युवती कल्याण मंडळाच्या सदस्या प्रा.डॉ.रेणुका कुनाळे उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या तदलापुरे या विद्यार्थिनींने केले तर आभार स्वामी अंजली या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गोपाल सोमानी यांचे व अंकुश भुसावळे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments