Latest News

6/recent/ticker-posts

धार्मिक संमेलनासाठी उर्दू शाळांना दोन दिवसांची सुट्टी

धार्मिक संमेलनासाठी उर्दू शाळांना दोन दिवसांची सुट्टी


शेख बी जी

लातूर:  लातूर जिल्ह्याचे धार्मिक संमेलन औसा येथे होणार असल्याने संमेलनाला उपस्थित राहता यावे यासाठी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दोन दिवसांची सुट्टी दिली आहे. 5 व 6 डिसेंबर या दोन दिवसांची सुट्टी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पत्र शिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकांना दिले आहे. या दोन दिवसांची सुट्टी मिळावी यासाठी उर्दू शाळेतील सर्व शिक्षकांनी शिक्षणधिकारी यांना विनंती अर्ज केला होता. त्या विनंती अर्जाचा विचार करून धार्मिक संमेलनात उपस्थित राहण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पाच व सहा डिसेंबर ची सुट्टी दिली आहे. ही दिलेली सुट्टी येणाऱ्या प्रत्येक शनिवारी दुपारच्या सत्रात पूर्ण वेळ शाळा घेऊन पूर्ण करावयाचे आदेशही देण्यात आले आहेत. सलग चार शनिवार पूर्ण वेळ शाळा घेण्यात यावी असे पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments