महेश पाळणे यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार
लातूर: येथील क्रीडा पत्रकार महेश शिवहर पाळणे यांना नाशिक येथील श्री कालिकादेवी मंदिर संस्थान व क्रीडा संस्कृती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून ५ जानेवारी रोजी या पुरस्काराचे नाशिक येथील श्री कालिकादेवी मंदिर सभागृहात वितरण होणार आहे. महेश पाळणे हे गेल्या १७ वर्षांपासून क्रीडा पत्रकारितेत कार्यरत असून, आतापर्यंत त्यांनी विविध क्रीडा स्पर्धेचे व खेळाडूंच्या कौशल्याचे वार्तांकन केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
0 Comments