Latest News

6/recent/ticker-posts

नागपूर येथील अधिवेशनात किल्लारी तालुका निर्मितीचे विधानपरिषद सभापती निलम गोरे यांना निवेदन सादर करताना शिष्टमंडळ

नागपूर येथील अधिवेशनात किल्लारी तालुका निर्मितीचे विधानपरिषद सभापती निलम गोरे यांना निवेदन सादर करताना शिष्टमंडळ

बी डी उबाळे

औसा: नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात तीस वर्षापासूनची किल्लारी तालुका निर्मितीची मागणी पूर्ण करावी. यासाठी विधानपरिषद सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते आमदार यांना किल्लारी तालुका व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनानंतर शिष्टमंडळाने गुरुवारी दि 22 डिसेंबर रोजी निवेदन सादर करत तालुका जाहीर करावा अशी मागणी केली.

किल्लारी हे ३० हजार लोकसंख्या असलेले गाव आहे परिसरातील पण ५२ गावचे व्यापारी केंद्र आहे. शासनास वेळोवेळी निवेदने देऊनही न्याय मिळाला नाही. येथे कृषी उत्पन्न उपबाजार समिती, शासकीय ग्रामीण होते. रुग्णालय पोलीस स्टेशन पशुवैद्यकीय श्रेणी एक दवाखाना कृषी कार्यालय साखर कारखाना राष्ट्रीयकृत बँका वाचनालय शाळा महाविद्यालय सहकारी बँका आयुष रुग्णालय अशा विविध सुविधा आहेत.वयोवृद्ध नागरिकसाठीचा लाभ घेण्यासाठी परिसरातील ६७ गावातील नागरिक किल्लारीत येतात. यामुळे किल्लारी तालुका होणे आत्यावश्याक आहे.याकरिता निवेदन देताना प्रभारी सरपंच युवराज गायकवाड,औसा बाजार समितीचे उपसभापती जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, गुंडाप्पा बालकुंदे, गोविंद भोसले, रोहिदास हजारे आदी उपस्थित होते.

विधानपरिषद उपसभापती निलम गोरे ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते विधानसभा अजित पवार, औसा आमदार अभिमन्यू पवार  यांना शिष्टमंडळाने कामापेक्षित असे निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments