Latest News

6/recent/ticker-posts

अस्थी अभिवादना करिता भिम अनुयांयीनी मोठ्या संख्येनी उपस्थित रहाण्याचे समन्वय समितीचे अवाहन

अस्थी अभिवादना करिता भिम अनुयांयीनी मोठ्या संख्येनी उपस्थित रहाण्याचे समन्वय समितीचे अवाहन

खासदार आमदारांसह भिक्कु संघ उपस्थित रहाणार समन्वय समितीची पत्रकार परिषदेत माहिती

निळकंठेश्वर चव्हाण

पानगाव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पानगांव येथे असलेल्या पवित्र अस्थीला अभिवादन करण्या करिता महापरिनिर्वाण दिनी लाखों आंबेडकरी अनुयांयी येत असतात कार्यक्रमाची तय्यारी अंतीम टप्यात आली असून अभिवादना करिता जिल्हयातील खासदारासह सर्व आमदारांची उपस्थिती रहाणार असून भिक्कु संघ धम्मदेसना देणार असल्याने भिम अनुयांयीनी आपल्या मुक्ती दात्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनी उपस्थित रहाण्याचे अवाहन समन्वय समितीने पत्रकार परिषदेत केले आहे.

पानगांव ता.रेणापुर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाबाबत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक महापरिनिर्वाण दिन समितीच्या वतीने चैत्य स्मारक येथे शनिवार (दि.३ ) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या अस्थि अभिवादन सभेकरिता खासदार सुधाकर श्रृंगारे,आ. धिरज देशमुख, माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, विधान परिषदेचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड, आ. बाबासाहेब पाटील, आ.अभिमन्यु पवार, माजी आ.वैजनाथ शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी काकडे याच्या सह. आनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सुयोजक समितीने पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या पत्रकार परिषदेला सार्वजनिक समितीचे माजी जि.प.सदस्य ईश्वर गुडे, कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती चंद्रचुड चव्हाण, मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, शिवसेनेचे (बाळासाहेब )ता.अध्यक्ष गोंविद दुड्डे, व्हि.के.आचार्य (अध्यक्ष-चैत्य स्मारक ट्रस्ट), नामदेव आचार्य, उपसरपंच शिवाजी आचार्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments