Latest News

6/recent/ticker-posts

भादा जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छ्ता ग्रहाचे भूमिपूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते

भादा जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छ्ता ग्रहाचे भूमिपूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची व मुलींची या ठिकाणी पहिली ते दहावीची शाळा एकत्रित असून पट संख्या 600 पेक्षा जास्त आहे यामुळे या ठिकाणी उपलब्ध स्वच्छतागृह व्यवस्थित रित्या उपलब्ध नाही ही बाब गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांना समजल्याने त्यांनी याबाबत उपसरपंच बालाजी शिंदे यांना हे काम सुरू करण्यासाठी सुचविले यामुळे या कामाला ताबडतोब सुरुवात करण्यात आली असल्याचे समजते.

तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांच्या अनेक दिवसांच्या मागणीची दखल खुद्द गट विकास अधिकारी म्हेत्रे यांनी घेतल्याने भादा उपसरपंच बालाजी शिंदे यांनी काम ताबडतोब सुरू करून या स्वच्छता ग्रह निर्मितीचे पाऊल उचलले असून या मुले आणि मुली यांच्यासाठी एकाच वेळी दहा ते बारा विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहात जाता येईल अशा भव्य आणि सुंदर स्वच्छतागृहाची येथे निर्मिती केली जाणार आहे.

सध्या हे स्वच्छतागृह बांधकामासाठी शासनाकडून कोणताही सध्या निधी उपलब्ध झाला नसून हे काम पूर्ण होईपर्यंत निधी उपलब्ध करून हे काम पूर्णत्वास घेऊन जाण्याचा मानस उपसरपंच यांनी यावेळी व्यक्त केला. याकरिता या स्वच्छतागृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आनोख्या पद्धतीने चीमुकल्याच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवण्याच्या सूचना ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील यांनी दिल्याने हा कार्यक्रम बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1:00 वाजता संपन्न झाला.

यावेळी शाळेतीलच छोटे छोटे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना बोलावून त्यांच्या निष्पाप अशा चिमुकल्यांच्या हस्ते या स्वच्छतागृहाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी हे काम पाहणारे अभियंता गारठे,उपसरपंच बालाजी शिंदे,ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील,सूर्यकांत उबाळे ,तय्यब पठाण आणि जिल्हा परिषद दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक मोहन माकणे,बालाजी उबाळे,लखन लटूरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments