Latest News

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन

बी.डी.उबाळे यांच्या लेखणीतून...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन

"६ डिसेंबर" या तारखेला महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. डॉ आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. 

निधनापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी १० लाख अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध नागरिकांकडून 'बोधिसत्त्व' ही पदवी दिली गेली आहे. डॉ. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी नागरीक विविध मार्गाने चैत्यभूमीवर येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीम आनुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस मनोभावे त्रिवार अभिवादन करतात व डॉ. बाबासाहेबांचे, गौतम बुद्धाचे दर्शन घेतात. 

या दिवशी भारत तसेच जगभरातील डॉ. आंबेडकरवादी व्यक्ती डॉ. आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन केले जाते. राजकीय नेते व इतर मंडळी डॉ. बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना भेट देऊन वंदन करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 5 हजार वर्षांपूर्वीची जी बहुजन विरोधी अनिष्ट परंपरा एक वृत्ती लागू केली होती तिला कायद्याच्या चौकटीत बसवून अनिष्ट परंपरा रुढीला तिलांजली दिली आणि मनूस्मृतीतून बहुजनांवर अन्याय रुपी सूड उगविण्याचे किळसवाणी पशुतुल्य वागणूक देणारी रूढी परंपरा त्यांनी बहुजन विरोधी निर्माण केली होती ती अलगद बाजूला सारली.

त्या रुढी परंपरेस कायम मुक्त मानव जात करण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि सर्व मानव जातीस माणूस हा एक सन्माननीय आणि बुद्धिवान प्राणी आहे. त्यातील काहीना जीवन जगताना पशुतुल्य हीन वागणूक का दिली गेली? त्यांनाही मान सन्मान मिळालाच पाहिजे. ज्या माणसांना पशुतुल्य वागणूक दिली जात होती त्या पशुतुल्य मानवांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सविधांनाच्या रूपाने दिला तर जे माणूस असूनही मानवता विरोधी त्यांच्यात भेद केला जात होता त्या वृत्तीचे नागरिक होते त्यांना एक आदर्श नागरिक म्हणून कसे जगता येईल आणि दैनंदिन व्यवहारात वागता येईल अशी शिकवण त्यांनी भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुता ही लोकशाहीची मुळ कल्पना त्यांनी सर्व मानवाप्रती समानता शिकविणारे आणि रुजविण्याची तरतूद कायद्याने करून ठेवली आहे आणि एक मानव जीवन हे आदर्शवत कसे जगता येईल याची सर्वस्वी तरतूद त्यांनी भारतीय राज्यघटनेतून केली आहे. असे हे महान कार्य करण्यासाठी ते आयुष्यभर कोणाचीही पर्वा न करता स्वतः झीजले. जाती धर्माच्या नावावर देशात दुफळी निर्माण करणाऱ्या नागरिकांना "मी प्रथमता आणि अंतिमतः ही भारतीय आहे!" ही शिकवण ठासून त्यांनी दिली आणि जातीच्या नावावर देशामध्ये अराजकता माजविणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींना या महान संदेशातून मोठी चपराक दिली. ज्यामुळे देशात शांतता नांदण्यास नक्कीच मदत झाली आहे. अशा महान बोधिसत्वाचा महापरिनिर्वाण दिन देशभरात त्रिवार वंदन करून पंचशील आचरण करून मनोभावे अभिवादन केले जाते.


त्या महामानवास आजच्या महापरिनिर्वाणदिनी मानाचा मुजरा,जय भीम !नमो बुद्धाय!जय भारत!

Post a Comment

0 Comments