Latest News

6/recent/ticker-posts

औसा पंचायत समितीचे कडक गुरू परिसर स्वच्छता आहे धडक सुरू

औसा पंचायत समितीचे कडक गुरू परिसर स्वच्छता आहे धडक सुरू

बी. डी. उबाळे

औसा: पंचायत समितीचे आहेत कडक गुरु,यामुळे संपूर्ण परिसराची स्वच्छता आहे धडक सुरू. याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे ही पंचायत समितीची नवी इमारत कार्यान्वित करण्यात आल्यापासून या परिसराची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती.

यामुळे या परिसरात अस्वच्छतेचा उच्चांक झाला होता आणि या कार्यालयातील कर्मचारी तसेच तालुक्यातून येणारे वैयक्तिक लाभाचे लाभार्थी सह या औसा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावोगावची गुत्तेदारी करणारे गुत्तेदार यांचा वावर मोठ्या प्रमाणात पंचायत समितीमध्ये होता परंतु हा परिसर स्वच्छ करण्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते तर नुकतेच पदभार घेऊन तालुक्याला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणारे औशाचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी या पंचायत समितीचा पाठीमागचा भाग आणि परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी फळझाड असणारे नारळ या वृक्षाची लागवड अगदी हे वृक्ष जगले पाहिजेत या पद्धतीने केली आहे. प्रथम जेसीबीने मोठ्या प्रमाणात आवश्यक असे वृक्ष लागवडीसाठी मोठे आणि योग्य पद्धतीचा खड्डा घेण्यात आला असून त्यामध्ये काळी माती टाकण्यात आली त्यानंतर वृक्ष लागवडीसाठी सुरू दृढ अशा रोपाची निवड करण्यात आली आणि ते रोप लागवड करण्यात येऊन या लागवडीतील वृक्षांना दररोज आवश्यक ते पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली असून या कामी कर्मचारी बिराजदार, लांडगे सह या कार्यालयातील कर्मचारी सर्व या कामात साठी सर्वतोपरी मदत करीत असून हा परिसर तर स्वच्छ झालाच परंतु या ठिकाणी अस्ताव्यस्त होणारी पार्किंग यालाही एक साचेबद्ध पद्धतीने वळण लावण्यासाठी एका कर्मचा- याची नियुक्ती करून वाहने व्यवस्थित आणि पार्किंगच्या ठिकाणी लावा हे सांगण्यासाठी एकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराला स्वच्छ आणि सुंदर असे स्वरूप आले असून आतापर्यंत असलेले अस्ताव्यस्त परिसर आता अगदी साचेबद्ध पद्धतीने दिसत असल्याने येणारा प्रत्येक नागरिक हा आशिषय शिस्तप्रिय आणि वळण लावणारे अधिकारी आल्याचे पाहून त्याही सर्वसामान्य व्यक्तीला आनंद वाटल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती सध्या औसा पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी निर्माण केल्याची चर्चा सध्या औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments