Latest News

6/recent/ticker-posts

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्र महाविद्यालयातील ७ विद्यार्थी

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्र महाविद्यालयातील ७ विद्यार्थी

निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाची बीसीए (संगणक शास्त्र) व बी.व्होक. शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उन्हाळी परीक्षा २०२२ परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विद्यापीठ गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवीला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परीक्षा जून/जुलै  २०२२ मध्ये कोव्हीड १९ नंतर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. या परीक्षांची शाखानिहाय गुणवत्ता यादी स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेड यांनी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महाराष्ट्र महाविद्यालयाच्या बीसीए शाखेची विद्यार्थिनी कु. यशोदा राम दिवे  हिने विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.


बी.व्होक. शाखेच्या वेब प्रिटींग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातील विद्यार्थी आश्विनी भिमराव हाजारे हीने ८९.२० टक्के घेऊन विद्यापीठातून सर्वप्रथम, कलोबा अर्जुन सुर्यवंशी याने ८८.२० टक्के घेऊन विद्यापीठातून द्वितीय व पुजा दत्तात्रय जाधव हीने ८७.७८ टक्के घेऊन विद्यापीठातून तृतीय येण्याचा बहुमान मिळविला. बी.व्होक. शाखेतीलच फुड प्रोसेसिंग, प्रिझरवेशन अँन्ड स्टोरेज अभ्यासक्रमातील विद्यार्थी रोहिणी सत्यवान शेळके हीने ९१.५१ टक्के घेऊन विद्यापीठातून सर्वप्रथम, अंजली गोपाळराव सावंत हीने ९०.४० टक्के घेऊन विद्यापीठातून द्वितीय तर वैष्णवी राम सगरे हीने ८९.५१ टक्के घेऊन विद्यापीठातून तृतीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये यशाची परंपरा कायम ठेवली आहे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिवाजीराव पाटील निलंगेकर , हस्ते सत्कार करण्यात आला.


 विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल संस्था सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव कोलपुके, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. धनंजय जाधव, स्टाफ सचिव प्रा. सुरेश कुलकर्णी, बी.व्होक. शाखेचे नोडल अधिकारी डॉ. मिलींद चौधरी, संगणकशास्त्र विभागाचे  विभागप्रमुख प्रा. रवींद्र मदरसे, बी.व्होक. शाखेचे प्रा. पंकज पवार, प्रा. श्रीनिवास काकडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments