Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यात तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

औसा तालुक्यात तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

बि.डी.उबाळे 

औसा: तालुक्यातील खरीप हंगाम शेतकऱ्यांची असलेली आर्थिक मदार तेही पूर्णपणे गेल्याचे चित्र औसा तालुक्यामध्ये दिसून येत आहे.

सध्या औसा तालुक्यातील खरीप हंगामातील तूर या पिकावर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक आशा टिकून होत्या परंतु बुरशीजन्य आजारामुळे या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून उभे तुर पिक पूर्णपणे रोगाने जागेवर पाना फुलासह वाळून गेल्याने यावर्षी तूरडाळ मोठ्या प्रमाणात महागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

यावर्षी औसा तालुक्यातील खरीप हंगामाची सुरुवात ही पावसाने उशिरा सुरू होऊन करण्यात आली हा खरीप हंगाम होत असताना पाऊस वेळी अवेळी पडला आणि कोवळी पिके असताना संततधार पाऊस पडल्याने त्या कोवळ्या पिकावर मोठ्या प्रमाणात गोगलगाय यांचा प्रादुर्भाव दिसून आला.

 ज्यामध्ये शेकडो एकर प्लॉट या गोगलगाय ने खाऊन फस्त केला तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतजमिनी पिकासह वाहून गेल्या तर हे संकट टळते न तळते तोपर्यंत पिके कमी जास्त पावसावरती काढणी योग्य झाली परंतु पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्यावर अवकृपा करून असलेली उभे पिके संतत धार पाऊस जोराचा पाऊस अतिवृष्टी यामध्ये ही पिके शेतावरती नासून गेली,वाहून गेली आणि शेतकऱ्यांच्या हातावर काहीही आले नाही.

यामुळे शासनाने तुटपुंजे की होईना अनुदान जाहीर करून ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.परंतु विमा कंपनीकडे जोखीम राहण्याकरिता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरण्यात आलेला होता परंतु तो विमा आता विमा कंपनी विविध कारणे पुढे करून मंजूर करीत नाही या बाबीकडे शासन आणि प्रशासन या दोघांनीही पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशी मिळेल हे पाहणे आवश्यक असतानाही या बाबीकडे शासन आणि प्रशासन पाहत नसल्याने ही विमा कंपनी सैराट सुटून शेतकऱ्यांना विमा मंजूर करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामुळे शासनाने सध्या औसा तालुक्यामध्ये खरीप हंगामातील आलेले तुरीवरील संकट हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दूर करावे अशी मागणी औसा तालुक्यातील भादा व परिसरातील शेतकरी करीत आहेत.


तुर पिकावर फ्युजॅरियम या बुरशीमुळे होणारी मर, रायझोक्टेनिया बुरशीमुळे होणारा मूळकुजव्या रोग आणि कोलेतोट्राय या बुरशीमुळे येणारा करपा रोग यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर तुर पिकाचे नुकसान दिसून येत आहे. असाच प्रादुर्भाव गतवर्षी पण  तुर पिकावर आढळून आलेला होता. याचबरोबर स्टरीलिटी मोझॅक म्हणजेच वांझ रोग याचा पण तुरीवर प्रादुर्भाव दिसत आहे. 

 सदर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे, रोगप्रतिकारक वाणांची निवड करणे, पिकांची फेरपालट, ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स सारख्या उपयुक्त बुरशींचा जमिनीमध्ये वापर करणे, मारुती सारख्या  तुरीच्या जुन्या वाणांची पेरणी न करणे आणि योग्य मशागत करणे या बाबींचा अवलंब केल्यास या रोगांचा प्रसार कमी करता येतो.

- विकास लटूरे

मंडल कृषि अधिकारी,लामजना ता औसा.

Post a Comment

0 Comments