Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर परिवाराचा दिशादर्शक संविधान उद्देशिका उपक्रम अनुकरणीय- तृप्ती देसाई

माझं लातूर परिवाराचा दिशादर्शक संविधान उद्देशिका उपक्रम अनुकरणीय- तृप्ती देसाई 

लातूर:  माझं लातूर परिवाराने शाळा आणि शासकिय कार्यालयात  संविधान उद्देशिका मोफत भेट देण्याचा अनुकरणीय सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाची मूल्य रुजण्यास याचा नक्कीच फायदा होईल असे मत भुमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तथा धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

माझं लातूर परिवाराच्या वतीने जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी आज तृप्ती देसाई यांना पुणे येथील निवासस्थानी संविधान उद्देशिका भेट दिली यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझं लातूर परिवाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम सुरु केला आहे. गत ८ महिन्यापासून लातूर जिल्ह्यासह नांदेड, मुंबई आणि सीमावर्ती भागातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्य रुजावित, संविधानाप्रती आदर आणि आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला. आजपर्यंत जवळपास ४५० संविधान उद्देशिका माझं लातूर परिवाराने  मोफत वितरित केल्या असून शाळा आणि शासकीय कार्यालयातील दर्शनी भागात लावण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments