Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यात एकाच वेळी मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्त्यांचा शुभारंभ

औसा तालुक्यात एकाच वेळी मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्त्यांचा शुभारंभ

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022रोजी सकाळी औसा आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून हा ग्राम समृद्धी मातोश्री पानंद रस्त्याचे मजबुतीकरण,खडीकरण उद्घाटन/शुभारंभ औसा तालुक्यामध्ये एकाच वेळी करण्यात आले. यावेळी भादा येथील भादा - येलोरी-बोरफळ या 2 किमी पानंद रस्त्याचे उद्घाटन आणि शुभारंभ करण्यात आला. हा मातोश्री शेत पानंद रस्ता मिशन मोडमध्ये सुरू करून शेतकऱ्यांच्या मोठ्या उपयोगाचा असून अशा रस्त्यामुळे औसा तालुक्याचा विकास होण्यास मोठी गती मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

कारण या शेत रस्त्यामुळे शेतीला जाण्याचे मार्ग आणि शेतीसाठी उपलब्ध होणारी सुविधा ही तात्काळ या रस्त्यामुळे मिळणार असल्याने औसा तालुक्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे आज या भादा येथील मातोश्री शेत पानंद रस्त्याचे मिशन मोडमध्ये, मजबुतीकरण आणि खडीकरणाचे कामाचे उद्घाटन आणि शुभारंभ एकाचवेळी तालुक्यात करण्यात आला.

औसा तालुक्यातील मातोश्री शेत पानंद रस्ते मजबतीकरण आणि खडीकरण कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी औशाचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी तालुक्यामध्ये विविध भागात नियोजन करून सक्षम टीमची नियुक्ती करून कामांना गती देण्यात आली आहे. याच कामानिमित्त भादा येथे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत बारबोले,तांत्रिक सहाय्यक नितीन चव्हाण,मोरे आदी सह भादा येथील उपसरपंच बालाजी शिंदे(बी एम), ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,मी. सरपंच हनुमंत दरेकर,ग्रा रो से बालाजी उबाळे,किशोर चांबारगे,सुनील गिरी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments