Latest News

6/recent/ticker-posts

आंतरभारतीच्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर,नांदेडचे कोकंडाकर सर्वप्रथम

आंतरभारतीच्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर,नांदेडचे कोकंडाकर सर्वप्रथम


उदगीरच्या स्नेहमीलन मेळाव्यात वितरण

आंबाजोगाई: आंतरभरतीच्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेत नांदेडच्या जे. आर. कोकंडाकर यांना दहा हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला असून सात हजार रुपयांच्या द्वितीय पुरस्काराचे मानकरी आंबाजोगाईचे डॉ. सागर शरद कुलकर्णी ठरले आहेत. तीन हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार जालन्याच्या अंतरा धनश्री रामदास कुलकर्णी हिला मिळाला आहे.

आंतरभरतीच्या वतीने 'महात्मा गांधींची प्रासंगीकता' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. स्थानिक स्तरावर 2 ऑक्टोबर रोजी तीन बक्षिसे देण्यात आली. बक्षीस पात्र ठरलेले तीन निबंध राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आले. त्यातून तीन निबंधाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आंतरभारतीने अमर हबीब (संयोजक), संगीता देशमुख (वसमत) व कल्पना हेलसकर (सेलू) यांची या स्पर्धेसाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने या स्पर्धेचे नियोजन केले, त्यांना स्थानिक संयोजकांनी साथ दिली. स्थानिक स्तरावर भरपूर प्रतिसाद मिळाला.

उदगीरच्या स्नेहमीलन मेळाव्यात वितरण


25 डिसेंबर रोजी उदगीर येथे आंतरभारतीचा स्नेहमीलन मेळावा होत आहे. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येतात. त्यात निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाणार आहे अशी माहिती आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी दिली.

Post a Comment

0 Comments