माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी दिली भादा येथील पाटील कुटुंबीयांना भेट
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथील रमाकांत परमानंद पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून ते काँग्रेसचे कट्टर समर्थक आहेत.
त्यांच्या पत्नी कै सविता पाटील यांचे 4 डिसेंबर रोजी मध्यरात्री आकस्मिक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असून या पाटील कुटुंबावर मोठे संकट कोसळले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, जि प सदस्य धनंजय देशमुख,माजी सरपंच तथा तज्ञ संचालक मांजरा साखर महेंद्रनाथ भादेकर यांनी पाटील निवासस्थानी भेट दिली.
यावेळी पाटील कुटुंबातील रामानंद परमानंद पाटील,रमाकांत परमानंद पाटील,सुरेकांत परमानंद पाटील आणि मुंबई पोलीस मध्ये असलेले रविशंकर रमाकांत पाटील,अँड सुहास रामानंद पाटील,चेअरमन दत्तकुमार शिंदे,बालाजी उबाळे,गोविंद शिवलकर आदी उपस्थित होते.
0 Comments