Latest News

6/recent/ticker-posts

लातूरचे जुगलकिशोर तोष्णीवाल "ग्लोबल एस्ट्रो आयकॉन" पुरस्काराने सन्मानित

लातूरचे जुगलकिशोर तोष्णीवाल "ग्लोबल एस्ट्रो आयकॉन" पुरस्काराने सन्मानित

लातूर: शहरातील तरुण व्यावसायिक तथा ज्योतिष तंत्रसाधक जुगलकिशोर तोष्णीवाल यांना इंदौर येथे संपन्न झालेल्या तृतीय वेदांग राष्ट्रीय ज्योतिष महोत्सवात "ग्लोबल एस्ट्रो आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.

इंदौर येथील माता भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थानच्या वतीने २४ आणि २५ डिसेंबर रोजी भव्य अशा तृतीय वेदांग राष्ट्रीय ज्योतिष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देशभरातील नामवंत ज्योतिष तज्ञ आणि साधक उपस्थित होते. याप्रसंगी ज्योतिष विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ तंत्रसाधकांचा गौरव करण्यात आला.

लातूरचे तरुण व्यावसायिक आणि गेल्या ५ वर्षांपासून ज्योतिष विज्ञानातील तंत्रसाधना या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जुगलकिशोर तोष्णीवाल यांना मान्यवरांच्या हस्ते "ग्लोबल एस्ट्रो आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सुवर्णपदक पटकावत जुगलकिशोरने या महोत्सवात लातूरचे नाव कोरले. माता भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थानचे संस्थापक अध्यक्ष डॉ आचार्य संतोष भार्गव, खासदार प्रविण निषाद, यांच्यासह देशभरातील नामवंत ज्योतिष तज्ञ या महोत्सवात सहभागी झाले होते. या पुरस्काराबद्दल तोष्णीवाल यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments