जागृत देवस्थान नागोबा मंदिर जीर्णोद्धार पहिला टप्पा पूर्ण, दुसरा टप्प्या बांधकामसाठी निधीची आवश्यकता
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथील मुख्य चौकामध्ये असलेले जागृत देवस्थान श्री नागोबा मंदिर जीर्णोद्धार कामाचा पहिला टप्पा देणगीदार याच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आणि मंदिर नवनिर्माण कार्यकर्त्याचा ही अखंड पाठपुराव्याच्या जोरावर या मंदिर बांधकाम पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.
आता पुढील दुसऱ्या बांधकाम टप्प्यास सुरुवात करण्यात येणार आहे,परंतु आता निधीची निकडची आवश्यकता असल्याने सर्व भाविक भक्त आणि नागरिकांना या बांधकाम कमी देणगी जमा करण्याबाबत सोशल मीडियावर,प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्याही देणगीदार आवाहन करण्यात आले आहे.
भादा गावचे जागृत देवस्थान श्री नागोबा मंदिर जीर्णोद्धार कामाचा पहिला टप्पा आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे भादेकर नागरीक या सारख्या देणगीदार भूमीपुत्रांच्या आणि शेतकरी,नागरिकांच्या सहकार्याने आगदी कमी कालावधीत हे सुरेख मंदिर नव निर्माण काम पूर्ण केले आहे.
आता यानंतरचे पुढील दुसऱ्या टप्प्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याने यासाठी मोठा खर्च आपेक्षीत असल्याने आर्थिक दृष्ट्या या कामी जीर्णोद्धार निधी असणे आवश्यक असल्याने आता उरवरीत श्रद्धाळू आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता मंदिर नवनिर्माण कामी भासत आहे.
याकरिता नागरिकांनी देणगी देऊन जागृत देवस्थान श्री नागोबा मंदिर नव निर्माणासाठी सहकार्य करावे अशी विनंती देवस्थान कमितीतील निवडक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते राम पाटील,दिपक मानधने यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना समितीचे मत व्यक्त केले आहे.
0 Comments