Latest News

6/recent/ticker-posts

धानोरा येलमवाडी ग्रामपंचायतीवर सत्याई ग्रामविकास पॅनल विजयी;सरपंचपदी सुरेश जाधव

धानोरा येलमवाडी ग्रामपंचायतीवर सत्याई ग्रामविकास पॅनल विजयी;सरपंचपदी सुरेश जाधव

निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १०:०० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या हाती सत्ता देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निलंगा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहा वाजता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीला सुरवात झाली, ग्रामपंचायत निवडणूकीचा मोठा टप्पा असल्याने गर्दी होती. यादरम्यान अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत.

जिंकल्यानंतर निवडूण आलेले सदस्य आपापल्या पद्धतीने विजयोत्सव साजरा करतायत. अशात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात धानोरा येलमवाडी ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आली आहे मागील 5 वर्ष ग्रामपंचायत भाजपा कडे होती आता काँग्रेसने सत्ता खेचून आणली आहे. निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांना विजयी घोषीत केल्यानंतर कार्यकर्त्यांसह राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन आनंदोउत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी नवनियुक्त सरपंच आणि सदस्य सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments