भादयात पारंपारिक नाटक सादरीकरण "घूंगराचा साथी संसाराची माती"
बी डी उबाळे
औसा: लातूर जिल्ह्यातील भादा हे गाव गेली अनेक वर्षापासून आजही इंटरनेटच्या काळात नाटकाची परंपरा कायम जपत आलं आहे. या गावात दरवर्षी ग्रामदैवत खंङोबा यात्रा निमित्त भादा येथे स्थानिक कलाकाराकङून नाटकाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी हि स्थानिक कलाकारांनी नाटकाचे बहारदार सादरीकरण केले. तसे तर यात्रा समिती कङून तीन दिवस विविध सास्कॄतिक कार्यक्राचे आयोजन करण्यात येते. यात्रा कमिटी अध्यक्ष जन्मेजय गायकवाड व इतर पदाधिका-यांनी या वर्षी हि नियोजन केले होते.
गूरूवार 1 डिसेंबर रोजी रात्री "घूंगराचा साथी संसाराची माती" हा तीन अंकी सामाजिक व कौटुंबिक मराठी नाटक हजारो नाट्य रसिकांच्या साक्षीने सादर करण्यात आला. गोविद शिवलकर निर्मित दिग्दर्शित व अभिनीत या नाटकात सिने अभिनेत्री अंजली गादे, पूणे,भारती अंधारे लातूर व पूजा लवटे बार्शी यांनी अभिनयाने रसिकांची मने जिंकली.
तसेच गोविंद शिवलकर, लक्ष्मण ऊबाळे श्रीपाद शिंदे,यूनूस पठाण, माधव गायकवाड, बाबूराव आगलावे, भूजंग चांभारगे यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केले. या नाटकाला संगीतकार निलेश वाघमारे व तबला वादक सिराज पठान यांनी साथ दिली. तसेच या नाटक उद्घाटनास भादा जि.प. सदस्य धनंजय देशमूख, विलासराव देशमूख मांजरा कारखाण्याचे तज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर व इतर मान्यवरांची उपस्थित होते.
0 Comments