लोकसहभागातून जि.प.कन्या प्रशाला आष्टी येथे प्रत्येक वर्गात व शाळा परीसरात सीसीटीव्हीची नजर !
आष्टी: दि.15 - जि.प.कन्या प्रशाला हि तालुक्यातील मुलींची शाळा म्हणुन मोठी पटसंख्या असलेली तसेच यशाची उज्वल परंपरा असणारी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा प्रशिक्षण तसेच संस्कार देणारी शाळा म्हणुन प्रसिध्द आहे. या शाळेतुन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थीनी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असुन कीत्येक मुली वैद्यकीय अधिकारी, विधीतज्ञ, अभियंते, पोलीस अधिकारी, सनदी लेखापाल, प्राध्यापिका शिक्षिका व वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कार्यरत आहेत. बदलत्या स्पर्धेचा काळ आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे जि.प शाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असुन या ज्ञानमंदिरांना लोकजागृती आणि लोकसहभागातूनच पुनर्जीवित करणे शक्य आहे.
या कर्तव्य भावनेतून शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब खताळ व सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. रीजवाना नदिम शेख आणि सर्व सदस्य, पालक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने 2 लाख रुपये कीमतीचे कॅमेरे बसवण्यात आले. जेणेकरून सुरक्षितता वाढेल त्रास देणारी व इमारतीची नासधुस करणारे शाळेत खाजगी वाहनं पार्क करणारे तसेच इतर व्यवस्थापन सोईचे आणि पारदर्शक होईल. या उपक्रमासाठी डॉ.विलासराव सोनवणे यांनी 30,000 रू रोख रखमेचा चेक दिला.
तसेच नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी 50,000 रु कीमतीचे वॉटर फील्टर उपलब्ध करुन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विलासराव सोनवणे होते यावेळी मुख्याध्यापक खताळ, शिक्षण प्रेमी नागरिक लक्ष्मण रेडेकर, डॉ.नदिम शेख, के.प्रा.शाळा.नं.1 चे मुख्याध्यापक सुरेश पवार, टाकळशिंग जि.प.शाळेचे मुख्याध्यापक महेश शिंदे, मंचावर उपस्थित होते. या उपक्रमासाठी भरीव सहकार्य करणार्यां डॉ.विलासराव सोनवणे व वाटर फिल्टर उपल्बध करुन देणारे धनश्री पतसंस्थेचे चेयरमन रंगनाथ धोंडे व सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानुन इतर लोकांनी आणि शाळेच्या माजी विद्यार्थींनींनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दळवी यांनी केले. सुत्रसंचालन देविदास शिंदे तर आभार खंडागळे यांनी मानले.
0 Comments