कौतुकास्पद,सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदाराना प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मान
लातूर: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व शाखेत नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार आपले दैनंदिन कर्तव्य बजावत असताना, कायद्याची अंमलबजावणी करीत असताना पोलिसांकडून चांगल्यात-चांगली कामगिरी व्हावी. जेणेकरून त्याचा फायदा समाजाला होईल. या संकल्पनेतून संबंधित पोलिसांना सोपविलेली कर्तव्य पार पाडताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरीचे मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांना दर महिन्याला प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात येत आहे. दिनांक 13 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याला कार्यरत असलेले नोव्हेंबर 2022 महिन्यामध्ये विविध शीर्षकाखाली सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी प्रशस्तीपत्र व बक्षीसपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये
गुड डिटेक्शन- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे सुधीर कोळसुरे, तसेच पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे.
सीसीटीएनएस डाटा फीडिंगमध्ये पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व महिला पोलीस अमलदार जरीना शेख.
अवैध धंद्यावर केलेल्या कारवाया या शीर्षकाखाली पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले.
उत्कृष्ट प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये पोलीस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे.
गुन्हे निर्गती या शीर्षकाखालील पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवन डमाळे.
वॉरंट बजावणी मध्ये देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर गणेश सोंडारे व पोलीस अमलदार शंकर पाटील.
डायल 112 रिस्पॉन्स टाइमिंग मध्ये पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वातील पोलिस अमलदार दत्तात्रय गायकवाड.
समन्स बजावणी या शीर्षकाखाली पोलीस ठाणे किनगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड तसेच पोलीस अंमलदार सुनील फड व सुनील श्रीरामे.
कौतुकास्पद कामगिरी मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर व चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पोलीस ठाणे अहमदपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, बिनतारी संदेश विभाग, लातूर चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश तांबारे, पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे,पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस अमलदार पुट्टेवाड. यांचा पोलीस अधीक्षक .सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस पत्र देऊन सन्मान व गौरव करण्यात आला
यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, सुनिल गोसावी, डॅनियल बेन, मधुकर पवार तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांच्या या नवीन नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पोलिस अधिकारी व अंमलदार हे आपले दैनंदिन कर्तव्यपार पाडत असताना अतिशय प्रभावीपणे व तत्परतेने पार पाडतील. त्यांच्या कार्याचे मूल्यांकन होऊन त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीसपत्र मिळाल्याने त्यांचेसुद्धा मनोबल व कर्तव्यतत्परता वाढून त्याचा फायदा समाजातील विविध घटकांना पोहोचणार आहे.
0 Comments