औसा तालुक्यातील उमेद महिला व कंत्राटी कल्यणकारी संघटनेच्या वतीने आ. संभाजी पाटील यांना निवेदन
बी डी उबाळे
औसा: दि.13 डिसेंम्बर रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत निलंगा तालुक्यात कार्यरत सर्व समुदात संसाधन महिला व कर्मचारी यांचे वतीने निलंगा तालुका आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना शाखा निलंगाच्या वतीने अभियानात कार्यरत सर्व समूह संसाधन महिला व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आमदार यांनी निवेदनातील विविध मागण्या संदर्भात उपस्थित महिला व कर्मचारी सोबत सकारात्मक व सविस्तर चर्चा करून महिलांना आश्वशित केले.
यावेळी उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा अध्यक्षा अलका लोखंडे, तालुका अध्यक्षा पल्लवी गायकवाड, तालुका संघटक पूजा थोटे, सदस्य नितीन रोडे, प्रभाग महिला प्रतिनिधी ज्योती माने,आशा तीप्पनबोने, अनुराधा वाडीकर, ज्योती बाकले, माधुरी दडपे, सरस्वती सारवडे, उषा पांडे,महानंदा क्षीरसागर यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन रोडे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, तालुका व्यवस्थापक शरद समुखराव, प्रभाग समन्वयक लिंबराज कुंभार हे उपस्थित होते. सदर निवेदनावर एकूण 82 समूह संससाधन महिलां व कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत.
0 Comments