Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत समरजीतने पटकाविले डबल सुवर्णपदक

राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत समरजीतने पटकाविले डबल सुवर्णपदक

राष्ट्रीय आर्चरी स्पर्धा : समरजीत व परीस महाराष्ट्र संघात 

उस्मानाबाद: पुणे(पिंपरी चिंचवड) येथे आयोजीत राज्यस्तरीय धनुर्विधा स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा आर्चरी संघटनेचे ९ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात समरजीत शिंदेने २ सुवर्ण पदक पटकाविले तर १४ वर्षे मुलांच्या वयोगटात परीस पाटील चौथे स्थानी राहीला असुन विजयवाडा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोघांचीही महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन च्या अधिपत्याखाली पिंपरी चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे चालू असलेल्या ९ वर्षाखालील व १४ वर्षाखालील राज्यस्तरीय आर्चरी अजिंक्यपद स्पर्धेत ९ वर्षाखालील कंपाऊंड प्रकारात ७२० पैकी ७०३ पॉईंट्स घेत समरजीतने २ सुवर्णपदके पटकाविले

तर १४ वर्षाखालील कंपाऊंड गटात परीस पाटील ६३१ पॉईंट्स घेत चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. जिल्हा धनुर्विधा प्रशिक्षन केंद्रा मध्ये जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक प्रविण गडदे, अभय वाघोलीकर, नितीन जामगे व कैलास लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारे समरजीत व परीस यांची १३ डिसेंबर पासून विजयवाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

Post a Comment

0 Comments