Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील खेळाडूंची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील खेळाडूंची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड

लातूर: क्रीडा संकुल येथे डॉजबॉल विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील 17 वर्ष मुली व 19 वर्ष मुले या संघाने विभाग स्तरावर विशेष कामगिरी केली असून त्यांची निवड नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.

लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे लोदगेकर, डॉजबॉल असोसिएशन लातूरचे सचिव अशोक परीट, प्रशिक्षक जयराज धोत्रे पंच फिरोज अत्तार, यशोदा पाटील, वासुधरा अपसिंगेकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले. खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर, मुख्याध्यापक आर.के. पाचंगे, उप मुख्याध्यापक पवार डी डी, पर्यवेक्षिका देशमुख मॅडम, क्रीडा शिक्षक एस. पाटील, मुजिबमिया सय्यद व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments