Latest News

6/recent/ticker-posts

निटुर-शिरोळ-हेळंब रस्त्यासाठी 20 कोटी निधी मंजुर;मार्चनंतर रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात

निटुर-शिरोळ-हेळंब रस्त्यासाठी 20 कोटी निधी मंजुर;मार्चनंतर रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात

सलीमखाँ पठाण

 निलंगा: निटुर-शिरोळ-हेळंब रस्त्यासाठी अनेक वर्ष असलेली प्रतिक्षा संपली असुन रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने 20 कोटी रु. निधी मंजुर केलेला आहे. अनेक वर्षापासुन रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी दुरावस्था असलेल्या निटुर - शिरोळ- हेळंब रस्ता आता निधी मंजुर झाल्याने गुळगुळीत होणार आहे. याबाबत गावकऱ्यांनी रस्ता लवकरच होईल असं समाधान व्यक्त केलं.


संबंधित विभागाचे अभियंता बिरादार यांच्याशी संपर्क केला असता निधी,तांत्रिक मान्यता अशा बाबींची पुर्तता करुन प्रत्यक्ष कामास मार्चनंतर सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले. निटुर - शिरोळ- हेळंब हा रस्ता मजबुत व्हावा,रस्त्याचा दर्जा हा उत्कृष्ट असावा हीच या रस्त्यालगतच्या गावकऱ्यांनी मागणी केली. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासली पाहिजे असेही मत यावेळी शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments