Latest News

6/recent/ticker-posts

14-15 जानेवारी 23 रोजी सेवाग्राम (वर्धा) येथे किसानपुत्र आंदोलनाचे चिंतन शिबीर;भूमिका आणि कार्यक्रम ठरणार

14-15 जानेवारी 23 रोजी सेवाग्राम (वर्धा) येथे किसानपुत्र आंदोलनाचे चिंतन शिबीर;भूमिका आणि कार्यक्रम ठरणार

आंबाजोगाई: 14-15 जानेवारी 23 रोजी सेवाग्राम (वर्धा) येथे किसानपुत्र आंदोलनाचे चिंतन शिबीर होणार आहे. या शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेळ्या जिल्ह्यातून आलेले 60 प्रमुख किसानपुत्र भाग घेतील. शेतकरीविरोधी सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे नरभक्षी कायदे रद्द व्हावे या साठी गेली सात वर्षे किसानपुत्र आंदोलन कार्य करीत आहे. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नसून हे एक आंदोलन आहे. सेवाग्रामच्या शिबिरात मोदी सरकार शेतकऱयांचे कैवारी की मारेकरी?, निवडणूक सुधारणा, शेतकरी आणि कर व किसानपुत्र आंदोलनाची आगामी दिशा या चार विषयांवर डॉ राजीव बसर्गेकर (नवी मुंबई), अमर हबीब (आंबाजोगाई), अमीत सिंग (पुणे) व ऍड. भूषण पाटील (औरंगाबाद) हे विषय प्रवेश करून देतील. त्या नंतर प्रत्येक विषयावर चर्चा होईल.

या शिवाय अमर हबीब यांच्या संयोजनात एका खुल्या सत्रात आगामी कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. या शिबिरात 'किसानपुत्रांच्या कविता' या नावाने कवी संमेलन होणार असून त्यात संदीप धावडे (वर्धा), नितीन राठोड (पुणे), सुभाष कच्छवे (परभणी), विश्वास सूर्यवंशी (पुणे) व शैलजा आंबेकर (परभणी) भाग घेतील.

19 मार्च उपवास व पदयात्रा

19मार्च रोजी साहेबराव करपे कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येचा दिवस. त्यानंतर सुमारे साडे चार लाख शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्याच्या मुलाचे निराकरण व्हावे महान देश व विदेशात लाखो लोक 19 मार्चला उपवास करतात. या वर्षी 19 मार्चच्या उपवासाचा मुख्य कार्यक्रम धुळे येथे होणार आहे. त्या पूर्वी  12 मार्च रोजी किनगाव येथे कडू आप्पा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा होईल. 13 में पासून पदयात्रा सुरू होईल. ती 19 मार्च रोजी धुळ्याला पोहचेल. तेथे दुपारी तीन ते पाच या वेळात सभा होईल. अनेक शेतकरी नेते व किसानपुत्र सहभागी होतील. 12 ते 19 मार्च या काळात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या जातील. असे किसानपुत्र आंदोलनाचेअमर हबीब यांनी प्रसिद्धी दिलेल्या सोशल मीडियाच्या पोस्टमार्फत कळविले आहे.


Post a Comment

0 Comments