भादा ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त आधार प्रतिष्ठान कडून आयोजित रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद
औसा- तालुक्यातील भादा येथील आधार प्रतिष्ठानकडून ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त गुरुवार दिं 30 नोव्हेंबर ,2022 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
आधार प्रतिष्ठान भादा हि स्वयंसेवी संस्था गेल्या तीन वर्षापासून शेती, शिक्षण, आरोग्य या प्रमुख क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने भरीव काम करीत असून या प्रतिष्ठानकडून गेल्या तीन वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून यामुळे भादा व परिसरासह इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात कामाच्या माध्यमातून आधार प्रतिष्ठान पोहोचले असून हे सामाजिक सेवाभावी संस्था लोकहितार्थ कामे सध्या मोठ्या प्रमाणात करीत असून ग्रामदैवत खंडोबा यात्रा ही दिनांक 29 नोव्हेबर ते 1 डिसेंबर या तीन दिवशी यात्रा भरत असल्याने या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमने रक्त संकलन केले. यामध्ये 102 बॉटल रक्त संकलन झाले.
यामुळे भविष्यामध्ये आवश्यक असणाऱ्या नागरिकांसाठी या रक्तदानाचा मोठा फायदाच होणार आहे आणि ज्या नागरिकांना विविध कारणाने रक्ताची आवश्यकता भासते आणि शासकीय रक्तपेढीकडे रक्तपुरवठा होत नाही यामुळे भादा येथील आधार प्रतिष्ठानकडून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर या शासकीय रक्तपेटीस हे रक्त संकलन आणि रक्तदान करून देण्यात आले यावेळी डॉक्टरची टीम डॉ. शरयू सूर्यवंशी, डॉ. दिपाली जाधव, चौधरी एस.आय, सूर्यवंशी बी.डी.रक्तसंक्रमण अधिकारी, गौरीशंकर स्वामी, वामन शिंदे, शाकीर शेख व आधार प्रतिष्ठानचे आर आर पाटील, बी डी उबाळे, मनोज पाटील, मनोज उबाळे, पांडुरंग बनसोडे, दिपक मांनधने, सुनिल राऊत, लखन लटूरे, प्रशांत पाटील, रियाज खोजे, शमशोड्डीन खोजे यांनी शिबिर यशस्वी साठी परिश्रम घेतले.
0 Comments