बिहार पॅटर्न वृक्ष लागवड संगोपन चांगल्या पद्धतीने करा- गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे
बेलकुंड:(प्रतिनीधी/महेश कोळी) औसा तालुक्यामध्ये बिहार पॅटर्न वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून त्याचे संगोपनही तितक्याच जबाबदारीने संबंधित ग्रामपंचायतीने करण्यात यावे अशा सूचना गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला दिल्या आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड करण्यात आलेले बिहार पॅटर्न वृक्ष लागवड केलेली रोपे 100% जिवंत असल्याची खात्री करून ई मस्टर काढण्याच्या सूचना दिल्या असून ज्या ठिकाणाचे रोप वाळून गेले आहेत.त्या ठिकाणी नवीन रोप लागवड करून ई मस्टर काढणे बंधनकारक आहे.
अन्यथा असे न होता जर वृक्ष लागवडीतील रोपे वाळून जात असतील आणि त्याबाबतचे मस्टर जर काढले तर संबंधित तांत्रिक अधिकारी,ग्रामसेवक,ग्राम रोजगार सेवक ,संबंधित यंत्रणा यांच्याकडून अशी काढलेली चुकीचे मस्टर बिल त्यांची वसूल करण्यात येतील.अशा सक्त सूचना गटविकास अधिकारी यांनी सोमवार दि 28 नोव्हेंबर 20 22 रोजी काढलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे दिलेल्या आहेत.
यामुळे औसा तालुक्यातील मस्टर मागणी करणेपूर्वी सर्व ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक आणि तांत्रिक अधिकारी यांनी रोपांची पाहणी करूनच पुढील मस्टर मागणी देण्यात यावी अशा स्पष्ट सूचना सध्या औसा तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी यांनी केल्या आहेत.
यामुळे तालुक्यातील वृक्ष लागवड पडलेली तुटाळ कमी होईल आणि वृक्ष लागवडीतील जिवंतपणाची टक्केवारी वाढेल आणि त्यामुळे तालुक्यातील संबंधित वृक्ष लागवडीचे कर्मचारी यांच्यावरही कोणतीही जबाबदारी किंवा कारवाईबाबत शक्यताच राहणार नाही आणि जिवंत वृक्ष लागवडीचा टक्का नक्कीच वाढेल आणि शासनाचा इच्छित केलेला उद्देश पुर्ती होईल अशा सूचना योग्यच असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे. गटविकास अधिकारी म्हेत्रे यांनी पंचायत समितीचा गटविकास अधिकारी म्हणून चार्ज घेतल्या पासून नरेगा विभागात शिस्त लागली असून कामचुकार कर्मचारी यांना चांगलीच वचक बसली आहे. अचानक कोणत्याही वेळी कोणत्याही विभागात भेट देत असल्याने टंगळमंगळ करणाऱ्यांवर वचक बसला असून त्यांनी शिस्तबध्द पध्दतीने काम सुरु केल्याने त्यांचे कौतुक होत असुन बोगस कामांना आळा बसत असल्याची चर्चा सुरु आहे.
0 Comments