Latest News

6/recent/ticker-posts

कोकळगाव मध्ये शालेय अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड

कोकळगाव मध्ये शालेय अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) शनिवार दि.8 जानेवारी रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव पूर्व येथील जि.प.प्रा.शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.यावेळी शालेय अध्यक्ष म्हणून सुरेश लामतुरे तर उपाध्यक्ष पदी प्रभावती दत्तात्रय जाधव यांची तर कोकळगाव पश्चिम जि.प.प्रा.शाळेत शालेय अध्यक्ष म्हणून मनोज लामतुरे, तर उपाध्यक्ष पदी धनराज चंद्रकांत लामतुरे यांची निवड करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे,गौतम कांबळे, एम.आय.तांबोळी, व्ही.एस.चामे,वंदना कांबळे,संदीप तिप्पनबोने,आरती कोल्हे, सरपंच गुरलिंग वाकडे, महाराष्ट्र वडार समाजाचे कार्याध्यक्ष वसंतराव मंजुळे, तानाजी लामतुरे,शिवाजी आगलावे, दत्तात्रय बनसोडे, शिवदर्शन लामतुरे, तुळशीराम शिंदे, लकेत पटेल, संजय लामतुरे, बाबू आगलावे, शरद पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कारही करण्यात आले.

Post a Comment

0 Comments