औसा तालुक्यात क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. भादा, आलमला, याकतपूर, कमालपुर येथे आद्य शिक्षिका, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्म 3 जानेवारीला झाला असून कमी वयामध्येच मोठी जवाबदारी त्यांच्यावर पडली आणि ती त्यांनी मोठ्या जिद्दीने ती जवाबदारी सांभाळली अशा कर्तबगार महिला अद्यशिक्षिका,थोर समाजसुधारक म ज्योतिबा फुले यांच्या जीवन संगीनी ज्ञानज्योति सावित्रीमाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत भादाकडून साजरी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भादा उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.
0 Comments