जिल्हाधिकारी यांचे आदेश आणि त्याची होत असलेली पायमल्ली...
लातूर: कोरोनाचा नवीन संसर्ग टाळण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक निर्बंध आणि नियम लागू करण्यात आले आहेत या नियमांची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते त्यासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केलेली असते मात्र हे नियम फक्त कागदावर आणि बॅनरवरच ठळकपणे पाळले जात असल्याचे चित्र जिल्हाभरात पहावयास मिळत आहे. लसीकरण प्रमाणपत्र आणि मास्क घातल्याशिवाय पेट्रोल, डिझेल दिले जाणार नाही असे आदेश असताना कसलीही तपासणी न करता सर्रासपणे पेट्रोल डिझेलची विक्री होताना शहरात व जिल्हाभरात दिसून येत आहे याचे हे बोलके चित्र...
अशा आस्थापना आणि नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत राहील. आतातरी संबंधित प्रशासकीय यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागतील ही अपेक्षा आहे.
सतीश तांदळे( मुक्त पत्रकार, लातूर )
0 Comments