Latest News

6/recent/ticker-posts

औसा नवीन मतदार यादी घोळ प्रकरणात सुनावणी नंतर राष्ट्रवादीची न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्टीकरण

औसा नवीन मतदार यादी घोळ प्रकरणात सुनावणी नंतर राष्ट्रवादीची न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्टीकरण


पाशा शेख

औसा: दि.१७ तालुक्यातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्य व पोलिसपाटील यांची ही नावे औसा शहराच्या दिनांक 05/01/2022 रोजी जाहीर झालेल्या मतदार यादीतील भाग क्रमांक 44 मध्ये हासेगाव तालुका औसा येथील विद्यमान ग्राम पंचायत सदस्य शितल लिंबराज थोरमोटे व विद्यमान पोलीस पाटील शिवराज शेषेराव कोरे यांची नावे आहेत. नजीकच्या काळात औसा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्यासाठी त्यासाठी मतदार यादी चा पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला होता यामध्ये अनेक नावे वरील भाग क्रमांक मध्ये लावण्यात आलेली आहेत. शहरातील प्रभाग क्र 2,3 व 4 मध्ये अनेक जणांची नावे बोगस पद्धतीने नोंद घेण्यात आलेली आहे, मुळात ही व्यक्ती औसा शहराचे रहिवासी नाहीत व ते औसा शहरात राहत नसताना मतदार यादीत नावे नोंद केली आहेत. निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची संगणमत करून आपले नाव औसा शहराच्या मतदार यादीत नोंदविलेली आहेत, सदर ग्रामपंचायत सदस्य यांना  पदावर अपात्र ठरवण्यासाठी शिफारस करण्यात यावी व सदरचे त्यांचे वर्तन हे त्यांच्या पदासाठी अशोभनीय वर्तन असल्याचे घोषित करावे. तसेच पोलीस पाटील यांना या पदावरून मुक्त करण्यासाठी शिफारस वजा आदेश निर्गमित व्हावेत याप्रकरणी त्यांची नावे औसा शहराच्या भाग क्रमांक  44 च्या यादीत नोंदवली असल्याबाबत संपूर्ण  प्रकरणाची चौकशी करावी व शहरातील इतर भाग क्रमांक 41 42 43 44 मध्ये बोगस पद्धतीने नवीन नावे नोंद घेण्यात आलेली आहे तसेच वरील बाबतीत हरकत घेण्यासाठी ही आम्हास वारंवार मागणी करूनही तहसील कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद अथवा मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही वरील प्रकरणी आम्हास न्याय द्यावा व औसा नगर परिषदेच्या निष्पक्ष, कायदेशीर, पारदर्शक व न्यायपद्धती निवडणूक पार होतील याची दक्षता घ्यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कडुन दिले होते. यासंदर्भात आज दिनांक १७ जानेवारी रोजी सुनावणी झाली त्यावेळी येथील ॲड.श्रीकांत सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना असे सांगितले की, आम्हाला योग्य न्याय नाही मिळाल्यास न्यायालयाचे दार ठोठावु. 

Post a Comment

0 Comments