मायेची ऊब हरपली
पुणे: 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दि.4 रोजी निधन झाले आहे. पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच महाराष्ट्र सरकारकडून त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. त्याआधी 2010 साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास 750 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, सिंधुताईंनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत राज्यातील तसेच देशातील हजारों अनाथ मुलांचा संभाळ केला. त्या 75 वर्षांच्या होत्या. सिंधुताई यांची प्राणज्योत मावळल्याने हजारो अनाथ बालकांची माय हरपली अखंड महाराष्ट्राची माय आज हरपली यामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माईना "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments