रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणाऱ्या तरुणावर पोलिसाकडून गुन्हा दाखल; आरोपींना अटक
लातूर पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की सध्याची covid-19 प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता प्रतिबंध नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
लातूर: या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, ओमिक्रोन /covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

जिल्हाधिकारी, लातूर यांनी प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने सर्वांनी सदरच्या नियमांचे काटे-कोरपणे पालन करणे आवश्यक असतानासुद्धा दिनांक 08/01/2022 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अब्दुल कलाम चौक, 60 फूट रोड येथे 6 ते 7 तरुण जिल्हाधिकारी लातूर यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करीत, एकत्रित जमा होऊन रस्त्यावर आरडा-ओरडा गोंधळ करीत वाढदिवस साजरा करीत असताना आढळून आले. त्यावरून पोलीस ठाणे, विवेकानंद चौक येथे पोलिस उपनिरीक्षक महेश गळगट्टे यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 30/2022 कलम 188 भादवी व कलम 135, 110/177 मुंबई पोलीस अधिनियम अन्वये इसम नामे विजान फारुक कुरेशी वय 18 वर्ष, फैज कलीम कुरेशी वय 18 वर्ष, सोहेल नूरखा पठाण, साबेर सलिम कुरेशी, अल्तमश नयुम कुरेशी, सर्व राहणार कुरेशी मोहल्ला, लातूर साहेब हाजी कुरेशी, राहणार हत्ते नगर लातूर, रीवन आरिफ कुरेशी, रा.कुरेशी मोहल्ला लातूर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी 3 आरोपीं नामे फैज कलीम कुरेशी, सोहेल पठाण, अल्तमस नईम कुरेशी यांना अटक करण्यात आलेली आहे. बाकी फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस आमलदार मुरुळे हे करीत आहेत.
0 Comments