निटुर(मोड) येथील व्यापारी मंडळाचे सरपंचांना निवेदन
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील निटुर मोड येथील व्यापारी मंडळ, निटुर मोड यांनी पाच दिवसांचा लॉकडाऊनला विरोध केला असुन लाॅकडाऊनचा निर्णय त्वरित मागे घ्यावा व कोरोनाच्या सर्व नियमांची कडक अंमलबजावणी गावपातळीवर करावी तसेच कोरोनाचे नियमांचे तंतोतंत पालन करुन व्यापार चालु ठेवण्याबाबत सरपंच परमेश्वर हासबे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बुडगे, उपाध्यक्ष लतिफ चाऊस, सचिव शिवशंकर हासबे तसेच दत्ता टमके, साबेर चाऊस, चंद्रकांत ऊकळे, नागनाथ दुधनाळे, डिगांबर पाटील, रामेश्वर बुडगे, बबन लक्ष्मण ऊकळे, फरज चाऊस, मनोज पाटील, इर्शाद गस्ते, श्याम अंबेगावे, सोमनाथ दुधनाळे, डिगांबर टमके, ईमाम सरदार आदी व्यापारी उपस्थित होते.
0 Comments