खेड तालुक्यातील किवळे येथे दिनेश बोराडे कुटुंबीयांनी केली दर्श वेळा अमावस्या साजरी
राजकुमार भंडारी
पुणे: किवळे ता. खेड येथील दिनेश बोराडे यांच्या शेतामध्ये दर्श वेळा अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली मुख्यतो वेळ आमावश्या अर्थात येळवस लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये साजरा होणारा शेतकऱ्याचा आनंदोत्सव होय. हा वनभोजन कार्यक्रमला विजय संतान, उपसंचालक क्रीडा,अमरावती , जयकुमार टेभरे, डॉ.संदीप चौधरी, दिनेश बोराडे कुटुंबीय व भाऊसाहेब भंडारे कुटुंबासह साजरी करण्यात आली, पश्चिम महाराष्ट्रात असे कार्यक्रम म्हणजे वन भोजन समजले जातात. विशेष म्हणजे लातूर पध्दतीने बनविलेले पदार्थ भज्जी, रोडगा, आंबील, भरीत शेतामध्ये कोप करून पांडव पूजन व नैवद्य दाखवून दर्श वेळा अमावस्या साजरी करण्यात आली.
0 Comments