कोकळगाव च्या जि.प.प्रा.शाळेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) सोमवार दि.10 जानेवारी रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव पूर्व येथील जि.प.प्रा.शाळेतील इयत्ता पाचवी च्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी अंकिता तुळशीराम शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड झाल्यामुळे तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती पात्र म्हणून अमृता संतोष वांजरवाडे ,संस्कार सुरेश लामतुरे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय अध्यक्ष सुरेश लामतुरे, उपाध्यक्षा प्रभावती जाधव, मुख्याध्यापक दीपक कांबळे, एम.आय.तांबोळी, व्ही.एस.चामे, वंदना कांबळे, शिवाजी आगलावे, किशोर आगलावे, यशवंत वागन्ना, शिवानंद मंगणे, जनाबाई गायकवाड,संतोष वांजरवाडे, दामोदर सुरवसे, राहुल आगलावे, तुळशीराम शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तयारी करवून घेणारे सह शिक्षक एम.आय.तांबोळी यांचाही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थी पालक यांचीही उपस्थिती होती.
0 Comments