Latest News

6/recent/ticker-posts

तज्ञ संचालक,जि.प.सदस्य यांचा पंढरपुरात सत्कार

तज्ञ संचालक,जि.प.सदस्य यांचा पंढरपुरात सत्कार



बी डी उबाळे

औसा: भादा तालुका औसा येथील माजी सरपंच तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर आणि भादा जि प गटाचे सदस्य धनंजय देशमुख यांचा पंढरपुरात सत्कार करण्यात आला. नववर्षानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या भादा येथील माजी सरपंच आणि भादा जिल्हा परिषद गटाचे सदस्य यांचा सत्कार पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त तथा नायब तहसीलदार बालाजी पुदळवाड यांनी शनिवार दि 1 जानेवारी 2022 रोजी तज्ञ संचालक महेंद्र भादेकर आणि भादा जि प गटाचे सदस्य धनंजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments