कोरोना जनजागृती थेट मस्जिदमध्ये;डॉ.स्वाती फेरे यांचे ग्रामिण भागात लसीकरणावर भर
बी डी उबाळे
औसा: नुकताच पंधरा ते आठरा वयोगटातील मुलांना लसिचे कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने आरोग्य यंत्रणा आता याच्या जनजागृतीसाठी सज्ज झाली आहे. याचाच भाग म्हणून मातोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नांदुर्गा उपकेंद्राच्या डॉ. स्वाती फेरे आणि त्यांच्या सहकार्यांनी गुबाळ येथील मस्जिद येथे जाऊन धार्मिक शिक्षण( ट्युशन ) घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कोरोना आणि लसीकरण या बाबत जनजागृती केली. थेट मस्जिद येथे जाऊन लसीकरणा बाबत जनजागृती करन्याची ही घटना विरळ असल्याने याचा परिणाम चांगला दिसुन आला. पंधरा ते आठरा वयोगटातील मुले लसीकरणासाठी तयार होत असुन शंभर टक्के लसीकरण हेच उद्दीष्ठ डोळ्यांसमोर ठेऊन आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. मातोळा ता. औसा प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या नांदुर्गा उपकेंद्राच्या कार्यकक्षेत नांदुर्गा, नांदुर्गा एक आणि गुबाळ ही गावे येतात हा भाग मुस्लिम बहूल आहे. लसिकरणा बाबत अजूनही कांही लोकांमध्ये गैरसमज असल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख, मातोळा प्राथमीक आरोग्य केंद्राचे डॉ. मकरंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वाती फेरे यांनी या तिन गावात शंभऱ टक्के लसीकरणाचे उद्दीष्ठ डोळ्यासमोर ठेऊन काम सुरु केले आहे.
0 Comments