शहाजहान शिरोरे यांचा सत्कार
शिरोळ:( प्रतिनिधि/सलीम पठाण) आनंदवाडी (आं.बु) तालुका निलंगा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शहाजहान जाफरसाब शिरोरे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं तसेच जिजाऊ प्रतिष्ठान शिरोळ यांच्यातर्फे शहाजहान शिरोरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, अरविंद कदम, सलीम पठाण, विनोद वाघमारे, पवन वाघमारे हे उपस्थित होते. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी जमेल तेवढे सहकार्य करण्याची भावना अध्यक्षांनी बोलून दाखवली शाळेच्या विकासासाठी जे काही करता येईल ते शालेय शिक्षण, गुणवत्ता आणि दर्जा कशा प्रकारे वाढवता येईल याकडे विशेष लक्ष देण्याची त्यांनी इच्छा दर्शवली.
0 Comments