Latest News

6/recent/ticker-posts

आयसीआयसीआय फाउंडेशनने केली बोरगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

आयसीआयसीआय फाउंडेशनने केली बोरगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी


बी डी उबाळे

औसा: तालुक्यात मध्ये आयसीआयसीआय फाउंडेशन कडून कल्याणकारी योजना बचतगटांसाठी राबविण्यात येत आहेत,तसेच राष्ट्रीय युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मौ बोरगाव(न) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या , या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भिसे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शन आनंद सूर्यवंशी आयसीआयसीआय फाऊंडेशनचे सीएफ यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयसीआयसीआय फाऊंडेशनचे गावस्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम महत्व व फायदे योजना शेती व शेतीपूरक व्यवसायातून बचत गटांनी उद्योग उभारणी कशी करावी व उद्योग सुरू करण्यासाठी फाउंडेशन कडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. खवा मशीन, दाळमिल, पनीर मशीन आणि अंडी उगवण्याची मशीन, गांडूळ खताचे बेड, कुकूटपालन अशा विविध प्रकारच्या योजना मध्ये 50 टक्के अनुदानावर आयसीआयसीआय फाउंडेशन कडून वितरीत करण्यात येणार आहेत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच सुकन्या योजना, ई- श्रमिक कार्ड याबद्दल माहिती देण्यात आली, ई- श्रम कार्ड म्हणजे काय? कोण पात्र आहेत कुठे करता येणार नोंदणी,  कोणत्या मिळणार सुविधा, या विषयावर सखोल मार्गदर्शन बचत गटांना करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रकाश सवई ग्राम विकास अधिकारी यांनी मांनले.

Post a Comment

0 Comments