Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे मोफत रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

नळेगाव येथे मोफत रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात


साई हॉस्पिटल, लातूर व अनिल चव्हाण मित्र मंडळ नळेगाव यांचा पुढाकार 

नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) चाकुर तालुक्यातील नळेगाव येथील श्री साई हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर लातूर व अनिल चव्हाण मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे तज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला. याच शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगावच्या वतीने कोविड लसीकरण करण्यात आले. यावेळी 75 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. सदरील शिबिरात डॉ.गजानन हलकंचे, डॉ.आकाश स्वामी, डॉ.मनीषा शेटे, डॉ.राजकुमार टकटवळे, डॉ.इर्शाद सय्यद, डॉ.सागर गार्ते, डॉ.महेश गुंडरे, डॉ.बालाजी पांचाळ, मोहसीन मणियार व सर्व वैद्यकीय स्टाफ यांनी योगदान दिले. यावेळी माजी उपसरपंच सूर्यकांतराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य नारायण मुंजाने, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शेषेराव मुंजाणे, व्हा.चेअरमन सूर्यकांतराव सावंत, माजी चेअरम दयानंद मानखेडे, माजी उपसरपंच पांडुरंग रेड्डी, माजी उपसरपंच मलशेट्टे, शिवजागृती महाविद्यालयचे अध्यक्ष बब्रुवान जाधव, संभाजी सेनेचे तालुका अध्यक्ष राजू शेलार, सत्यवान सावंत, ग्रा.पं.सदस्य श्याम मुंजाणे, उमाकांत सावंत, अस्फाक मुजावर, सतीश पांडे, दगडु सावळकर, खुद्बोदीन घोरवाडे, दिलीप मानखेडे, सोमनाथ बिराजदार, तुकाराम पाटील, शेषेराव येरोळकार, अमेमद घोरवाडे, दाऊद बागवान, अनिल पांचाळ, भद्रिनाथ सोनटकके, संतोष बिराजदार, गजानन बिराजदार, सत्यवान जाधव, कैलास चव्हाण, शिवाजी बरचे आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक तर प्रमोद हुडगे यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments