कै.राजाबाई धानोरकर विद्यालयाचे 92.31% लसीकरण पूर्ण
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) महाराष्ट्रात कोरोनाची दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे प्रशाशनाच्या वतीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. निलंगा तालुक्यातील धानोरा गावातील कै. राजाबाई धानोरकर विद्यालय धानोरा शाळेतील विद्यार्थ्यांना कोवॅक्सिनचे लसीकरण करण्यात आले आहे कै.राजाबाई धानोरकर विद्यालयाचे 92.31% लसीकरण करण्यात आले आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश माने यांच्या प्रयत्नाने 92.31% लसीकरण शक्य झाले आहे मुख्याध्यापक गणेश माने यांच्यावर गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी श्रीमती डॉ.चिवरे, काळे सिस्टर आशा वर्कर स्वामीताई, शिक्षक श्रीमती पवार, आरोग्यसेवक वाघमारे, मुख्याध्यापक गणेश माने, पाटील, शिंदे, मोरे शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
0 Comments