दर्श वेळा अमावस्या निमित्त शेतामध्ये केले 10 फळंवृक्ष लागवड
औसा: तालुक्यातील भादा येथे दर्श वेळा अमावस्या निमित्त लातूरहून आलेल्या सावंत कुटुंबाने शेतामध्ये छोट्या छोट्या बच्चे कंपनीसह वृक्षलागवडीची प्रक्रिया तो वेगळाच आनंद आणि अनुभव कुटुंबासह घेऊन लागवड पूर्ण केली. यावेळी छोटे छोटे बच्चे कंपनी मोठ्या आनंदाने वृक्ष लागवडीसाठी वृक्ष आणणे,पाणी देणे,खड्डा करण्यासाठी मदत करणे,खड्ड्यातील माती काढणे आदींसाठी मदत करत असल्याचे यावेळी दिसून आले. या सावंत कुटुंबातील परमेश्वर सावंत,आकाश सावंत, जयश्री सावंत, मंगल सावंत, अनिता सावंत, विमल भोसले, बच्चे कंपनी शिवम, वेदांत आदींनी परिश्रम घेतल्याचे दिसून आले. आणि आठ चिंचेचे वृक्ष आणि दोन आंब्याचे वृक्ष असे एकूण दहा वृक्षाची आज लागवड करण्यात आली.
0 Comments