Latest News

6/recent/ticker-posts

लातुर येथे Ifska इंनवेटेशनल ओपन महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पयनशिप उत्साहात

लातुर येथे Ifska इंनवेटेशनल ओपन महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पयनशिप उत्साहात 



के.वाय. पटवेकर

लातुर: दि. 26 डिसेंबर रोजी श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय,खाडगाव रोड,लातूर येथे इंटरनॅशनल फुनाकोशी शेटोकॉन कराटे असोसिएशन "Ifska इंनवेटेशनल ओपन महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियनशिप-2021" कराटे स्पर्धा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातून तब्बल साडेचारशे विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. काता, कुमिते या दोन खेळ प्रकारात चार बाउट वरती या स्पर्धा अतिशय रोमहर्षक व चित्तथरारक कला गुणांचे प्रदर्शन करीत स्पर्धकांनी घव-घवीत यश संपादन केले. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर व जिल्हा क्रीडधिकारी कसगावडे हे उपस्थित होते. तर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी डॉ.अजय पाटील, प्राचार्य श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय,लातूर सह गणेश मर्गजे, मुजफर सय्यद, रवीकुमार शिंदे आदी उपस्थित होते. शेवटी स्पर्धेचे आयोजक अजमेर शेख यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments