साने गुरुजी सेमी इंग्लिश स्कूल निटूर{ मोड } येथे CDS जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
निटूर: येथील साने गुरुजी सेमी इंग्लिश स्कूल निटूर{ मोड } येथेल शाळेत CDS जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचा तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांच्या पत्नीसह 14 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या सर्व शहिदांना शाळेच्या वतीने आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार राजकुमार सोनी, संस्थेचे अध्यक्ष धिरज भालके, सचिव प्रकाश चव्हाण, शिरीष भालके, शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर, काळे, बुरकुले मॅडम, जाधव मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments