भादा येथे श्रमदानातून केला वनराई बंधारा
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. शनिवार दि 25 डिसेंबर 2021 रोजी गावाच्या पश्चिमेस असणा-या पाणी पुरवठा विहिरीजवळ श्रमदान करून गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील नागरिक, शेजारील शेतकरी सदर श्रमदान कार्यास उत्साहाने उपस्थित होते. सदर वनराई बंधारा केल्यामुळे पाणी पुरवठा विहिरीचे पाणी पातळीत वाढ होणार आहे. तसेच जवळपासच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी विहिरीच्या पाण्यात वाढ होणार असल्याने शेतीसाठी पाणी पातळीत वाढ नक्कीच होणार आहे.
0 Comments