Latest News

6/recent/ticker-posts

गणिताची भीती कमी व्हावी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी शिरोळ येथे गणित उत्सवाचे आयोजन

गणिताची भीती कमी व्हावी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी शिरोळ येथे गणित उत्सवाचे आयोजन


जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिरोळ चा अभिनव उपक्रम

निलंगा:( प्रतिनिधी/सलिमभाई पठान ) गणित म्हणलं की विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण होते आणि ती भीती कमी होऊन आवड निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिरोळ यांच्या वतीने दिनांक 22 डिसेंबर रोजी गणित उत्सवाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध प्रकारच्या गणितीय रांगोळी काढून विद्यार्थ्यांना गणिता बद्दलचे आकर्षण आणि गणिताच्या सर्व संकल्पनांची थोडक्यात माहिती करून देण्यात आली. अशा प्रकारच्या विविध अभिनव उपक्रमांसाठी शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा उपक्रमशील शाळा म्हणून गणली जाते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली देवापुरे, गायकवाड, म्हेत्रे, जाधव, धडे यांनी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांनी पण हिरी-रीने सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments