नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन
शेख बी जी.
औसा: दि.२९ शहरात आज नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी शहराचे नगरसेवक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. औसा शहराची हद्दवाढ मागील पस्तीस वर्षा नंतर झाली आहे. ही हद्दवाढ विद्यमान नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या कालावधीत झाली. यांच्या प्रयत्नाने ही हद्दवाढ झाल्याची चर्चा शहरात आहे.हद्दवाढ झालेल्या भागातील लोकांची गैरसोय नेहमी होत होती.अनेक प्रसार माध्यमावर याची चर्चा होत असायची या अडचणींचा सामना येथील नगरसेवकासह पालिका प्रशासनाला करावा लागत असे लोक उलट-सुलट चर्चा करत असायचे. याठिकाणी सोयी सुविधा नसल्याने जनता नाराज असल्याचे निदर्शनास येत होते. या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हद्दवाढ करणे आवश्यक होते .हद्दवाढ नसल्याने कोणत्याही सोयी सुविधा पुरविण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण हद्दवाढ करून दूर केली होती. वाढीव झालेल्या क्षेत्रात सोयी सुविधा देण्यासाठी येथील पालिका प्रशासनाने सतत प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गटारी रोड व इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांचे उद्घाटन नगराध्यक्ष अफसर शेख व त्यांच्या नगरसेवकांनी केले. शहरात आज वेगवेगळ्या विविध कामाचे उद्घाटन झाल्याने शहर राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र दिसून येत होते. या उद्घाटनाची सुरुवात येथील बरकत नगर पासून करण्यात आली यावेळी बरकत नगर सोसायटीचे अध्यक्ष जलील पठाण उपाध्यक्ष समीरखान पठाण कोषाध्यक्ष आतिक बागवान सचिव शेख बी जी व प्रभारी नगराध्यक्षा किर्ती ताई कांबळे, माजी नगराध्यक्ष जावेद शेख पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव ,भरत सूर्यवंशी माजी स्वच्छता सभापती मुजाहिद शेख, काझी परवेश, मेहराज शेख, फहाद अरब दुधनकर, बिलाल सिद्दीकी,जमीर पठाण आदि उपस्थित होते.
0 Comments