निटुर येथील जामा मस्जिदचे माजी इमाम शमशोद्दीन सरदार यांचे दुःखद निधन
निटूर: येथील जामा मस्जिदचे माजी जेष्ठ इमाम शमशोद्दीन मौलासाहब सरदार यांचे निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन. दि. 16 डिसेंबर 2021 रोजी गुरुवार सायंकाळी अंदाजे 6:00 वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते 90 वर्षाचे होते. येथील जामा मस्जिदचे ते इमाम व पंचक्रोशीत सर्वपरिचित होते. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ मार्गदर्शक होते त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि. 17 डिसेंबर वार शुक्रवार रोजी( नमाज अदा झाल्यानंतर ) दुपारी 2:30 वाजता निटुर येथील कब्रिस्तान मध्ये दफन विधी (अंतीमसंस्कार) करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व तीन मुली, जावई नातू-पणतू असा मोठा परिवार आहे. सुजावोदिन(बाबू) सरदार, गफार सरदार यांचे वडील होत "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments